Latest News

6/recent/ticker-posts

अनुरक्षण गृहातील अनाथ निराधार मुलांसाठी २ वर्षे शिथिल करण्याच्या निर्णयांचे स्वागत

अनुरक्षण गृहातील अनाथ निराधार मुलांसाठी २ वर्षे शिथिल करण्याच्या निर्णयांचे स्वागत


बी जी शेख

लातूर: दि.०२.०५.२०२१ महाविकास आघाडी सरकारच्या बैठकीत अनुरक्षण गृहातील अनाथ निराधार मुलांना मोठा दिलासा दायक संस्थातील कालावधी पूर्ण झाल्यानंतरही २वर्षे अधिकची राहता येणार आहे,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य व सत्युत्य निर्णय घेतल्याबद्दल महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे, ना अजितदादा पवार, ना बाळासाहेब थोरात, ना अमित विलासराव देशमुख,ना यशोमतीताई ठाकूर,ना ओमप्रकाश उर्फ बचु कडु, व महाविकास आघाडीच्या सर्व सहकाऱ्यांच्या पुढाकारातुन निर्णय घेतला आहे. बाल न्याय अधिनियमात 'बालक' या संज्ञेतील वयाची अट पूर्ण झाल्यामुळे बालकांच्या काळजी साठी कार्यरत संस्थांतून बाहेर पडावे लागू शकणाऱ्या बालकांना सध्याची कोरोना परिस्थिती पाहता मोठा दिलासा देण्याचा निर्णय राज्याच्या महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री अँड यशोमती ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नातून राज्यातील अनुरक्षण गृहामध्ये पात्र मुलांना अनुरक्षण सेवा पुरवण्यासाठी वयाची अट दोन वर्षांनी  शिथिल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे यामुळे या बालकांना अनुरक्षण गृहामध्ये अधिकची दोनवर्षं अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, प्रशिक्षण आदी सुविधा मिळणार आहेत. बालगृहातून बाहेर पडूनही ज्या अनाथ, निराधार मुलांना संस्थात्मक काळजीची आवश्यकता आहे अशा मुलांसाठी ही योजना १८ ते २१ वर्षे वयोगटातील मुलांसाठी राबविण्यात येते अपवादात्मक परिस्थिती मध्ये हा कालावधी वाढविण्याची तरतूद आहे. संस्था, बालगृह,निरीक्षण गृह, अनुरक्षण गृहातून बाहेर पडल्यानंतर शासन व स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने रोजगार मिळवून समाजात स्वतःच्या पायावर उभा राहिलेल्या बऱ्याचश्या मुलांचे रोजगार कोरोनाच्या आपत्ती काळात हिरावले गेले आहेत. ज्यांचे पालकत्व अल्पवयात शासनाने स्वीकारुन त्यांना सक्षम बनवले होते, त्या मुलांना परत या आपत्तीने रस्त्यावर येण्याची वेळ आणली होती ही बाब लक्षात घेऊन अशा मुलांना आधार देण्यासाठी निराधार मुलांसाठी कालावधी वाढविण्याचा निर्णय घेऊन शासनाने पालकत्व स्वीकारले आहे यामुळे खऱ्या अर्थाने निराधार, अनाथांना न्याय मिळणार असल्याचे सक्षम महिला, सदृढ बालक एक जनआंदोलनच्या अँड प्रदिपसिंह गंगणे यांनी व्यक्त केले आहे तर महाविकास आघाडीच्या निर्णयाचे स्वागत बालाजी पिंपळे, प्रा दत्तात्रय खरटमोल, ताहेरभाई सौदागर, प्रा ओमप्रकाश झुरळे,जमालोद्दीन मणियार,आनंद पारसेवार,अँड सुहास बेंद्रे,अँड अभिजित मगर,किरण कांबळे, सौ अँड सुषमा गंगणे बेंद्रे,  सौ अँड छाया मलवाडे कुचमे, श्रीकांत गंगणे,सौ अँड शितल जाधव,प्रविण नाबदे, संतोष मस्के, डॉ अंबादास कारेपूरकर,भीमराव दूनगावे, साईनाथ घोणे, दिगंबर कांबळे आदींनी जाहीर आभार व स्वागत केले आहे.

Post a Comment

0 Comments