कोकळगाव मध्ये शॉर्टसर्किटमुळे टायर पंमचरचे दुकान जळून लाखोंचे नुकसान
मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) गुरुवार दि. 6 मे रोजी निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील गुंडूपाशा अल्लावद्दीन शेख यांचे सकाळी आठ वाजण्यास सुमारास विद्युत तारेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानातील हवा चेक कम्प्रेसर मशीन,फ्रीझ,50 ट्युबटायर, मोटार सायकलचे स्पेअर पार्टस,12 पत्रे व दुकानातील इतर साहित्य असे जवळपास तीन लाखाचे नुकसान झाले असल्याचे दुकानदार गुंडुपाशा शेख यांनी "मराठी अस्मितेचा इशारा" च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. लॉक डाऊन सदृश्य परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी संसाराचा गाडा चालवणे कठीण झाले असताना केवळ हातावरच पोट भरणार्यासाठी पंमचर दुकान हेच उदरनिर्वाहासाठी साधन होते.तेही जळून खाक झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा आहे.स्वतःचे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी जळून खाक झाल्याचे पाहून गुंडूपाशा शेख यांच्या अश्रूंचा धारा धावू लागल्या होत्या. तलाठी आंबाटे हे घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केले.गुंडूपाशा शेख यांच्या उदरनिर्वाहाचे साधनच नाहीसे झाल्याने शासनाच्या वतीने त्यांना मदत मिळवून देण्यात यावी अशी मागणी नागरिकाद्वारे करण्यात येत आहे.
0 Comments