मानवतेच्या नात्याने सर्व खाजगी डॉक्टरांनी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आपली सेवा द्यावी- प्रा. मिरगाळे
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथील डॉ. दिनकर पाटील यांना तहसीलदारांच्या अहवालानुसार मा. जिल्हाधिकारी यांनी तडकाफडकी निलंबित केले. त्यामुळे निलंगा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांचे हाल होत आहेत. डॉ.दिनकर पाटील यांना निलंबित केल्यापासून जवळपास 26 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. या मृत्यूला कारणीभूत कोण, जबाबदार कोण, मा.साहेबांना विनंती आहे की कोरोना काळात अनेक व्यक्तिचा मृत्यू होत आहे त्यामुळे तात्काळ नवीन डॉक्टरची नियुक्ती करावी, निलंग्यातील सर्व खाजगी डॉक्टरांनी मानवतेच्या नात्याने उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णाची रोज दोन ते तीन तास सेवा करावी ही माझी आग्रहाची विनंती आहे. सध्या निलंगा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये डॉ.पाटील यांच्यासारखे तज्ञ डॉक्टर नाहीत, त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. डॉ. दिनकर पाटील यांना नोटीस न देता किंवा उपजिल्हा रुग्णालयातील इतर डॉक्टरांचा अभिप्राय न घेता व उपजिल्हाधिकारी मा.विकासजी माने यांचा सुद्धा अभिप्राय न घेता तहसीलदार गणेश जाधव यांनी तात्काळ अहवाल तयार करून जिल्हाधिकारी यांना पाठविला व त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. दिनकर पाटील यांना तात्काळ निलंबित केले ही गोष्ट सामान्य माणसाला खटकणारी आहे डॉ. दिनकर पाटील हे अविरतपणे मागील एक वर्षापासून कोरोणा रुग्णाची काळजीपूर्वक सेवा करत आहेत हे सर्वांनाच परिचित आहे. मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा डॉ. दिनकर पाटील यांच्याकामाची दखल घेऊन फोनद्वारे प्रशंसा केली आहे. अशा कामाप्रती एकनिष्ठ असलेल्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी निलंबन करणे कितपत योग्य आहे. निलंबन रद्द करणेबाबत या संदर्भामध्ये अनेक संघटना, सर्वपक्षीय नेत्यांनी निवेदन देऊन सुद्धा या प्रकरणावर काहीही चौकशी झाली नाही किंवा त्यांचे त्यावर निर्णय झाला नाही या प्रकरणाची ताबडतोब सखोल चौकशी करून योग्य तो निर्णय प्रशासनाने घ्यावा. याप्रकरणावर तात्काळ निर्णय न झाल्यास व नवीन तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती न झाल्यास शिवसेना व युवासेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवासेनेतर्फ देण्यात आला.

0 Comments