डॉ.पाटील यांच्या निलंबन आदेशाच्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल सादर करा- जिल्हाधिकारी
निलंगा:(तालूका प्रतिनिधी/इरफान शेख) उपजिल्हा रुग्णालय निलंगा येते कार्यरत असणारे डॉ.दिनकर एम.पाटील याना 26 एप्रिल रोजी तहसीलदार निलंगा यांच्या अहवाल व पंचनामानुसार हे प्रथम दोषी आढळून आल्यामुळे त्यांना या कार्यालयांचे संदर्भ क्र. 2 च्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे तरी निलंबित डॉ.दिनकर पाटील यांचे निलंबन आदेशाच्या अनुषंगाने सखोल चौकशी करणेकरिता अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक याची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी प्रकरणाशी सखोल चौकशी करून दोन दिवसात संयुक्त अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा असे जिल्हाधिकारी यांच्या पत्राद्वारे कळवण्यात आले आहे

0 Comments