नळेगाव बाजार पेठेत लॉकडाउनचे तीन तेरा
दुकानांचे अर्धे शटर उघडे,सर्व व्यवसाय जोरात,नियमांचे उल्लंघन
नळेगाव:(प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे) ब्रेक द चेन अंतर्गत संचारबंदी लागू असली तरी गावातील अनेक व्यावसायिक दुकानांचे शटर अर्धे उघडे ठेवून ग्राहकी करीत आहेत. त्यामुळे गावातील बाजारपेठेत सोशल डिस्ट्सन्सिंगचे तीन तेरा वाजले आहेत. कोरोनाचा वाढता प्राधुर्भाव पाहता संचार बंदीतील सूचनांचे उल्लंघन सुरु असताना गावातील प्रशासकीय पथक बघ्याची भूमिका घेत आहे. ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता स्थानिक प्रशासनाने संचारबंदीतील सूचनांचे पालन कठोर करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत नागरिकांसह व्यापाऱ्यानाही सूचित केले आहे. अनेक नागरिक, व्यापारी या प्रशासकीय सूचनांचे पालन नसल्याचे सध्या तरी चित्र दिसून येत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. अत्यावश्यक सेवेसह इतर व्यवसाय करणारे दुकान चालक शटर अर्धे उघडून व्यवसाय करत असून काही दुकानदार दुकानामध्ये काही ग्राहक घेऊन नियमांचे तीन तेरा वाजवत आहेत. तसेच नळेगाव येथे गुटखा विक्री,पान टपरी,बांधकाम साहित्य,कापड दुकान,जनरल स्टोअर्स, चहा हॉटेल,बिअर बार राजरोस सुरु आहेत.या व्यवसायिकामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याचे चिन्हे आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत संचारबंदी लागू केली आहे. याची कठोर अंमलबजावणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी,तहसीलदार यांनी दिल्या आहेत. त्यामुळे नळेगाव पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासनाणे लक्ष देऊन शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळून इतर दुकानदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

0 Comments