Latest News

6/recent/ticker-posts

राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची शिरोळ येथे मार्गदर्शनपर भेट

राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची शिरोळ येथे मार्गदर्शनपर भेट



शिरोळ: (प्रतिनिधी/सलीमभाई पठाण) बांबु लागवड आणी बांबुची शेती शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर आहे आणी यासाठी शासकीय यंत्रणा कशा प्रकारे शेतकऱ्यांना मदत करते याचं सखोल मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी नेते तथा राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शिरोळच्या तरुणाईचा उत्साह पाहुन वेळात वेळ काढुन सोमवारी रात्री उशिरा मार्गदर्शनपर भेट दिली. पुढील काळात शेतीविषयी आणी व्यावसायिक शेतीसाठी सर्व मदत आणी मार्गदर्शन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी शिरोळ ग्रा.पं.सदस्य सुर्यकांत जाधव, नवाज तांबोळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव  प्रगतीशील शेतकरी हणमंत जाधव, झटिंग कदम, अरविंद कदम, सिध्देश्वर कांबळे, नामदेव जाधव, बबन कदम आणी तरुण शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments