शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा वडारवाडा-बुजरुगवाडीत गौरव
लातूर : निलंगा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडारवाडा - बुजरुगवाडी येथील माजी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश मिळवत शाळेचे व गावाचे नाव उज्वल केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल गावात त्यांचा गौरव करण्यात आला.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गावातील मान्यवरांच्या हस्ते शाल, हार व रजिस्टर देऊन करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी जाधव,विठ्ठल भोयबार, साहेबराव भोयबार, भरत संगपाल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुजरुगवाडीचे मुख्याध्यापक शिवाजी जाधव सह साईनाथ माने, दत्ता पदकुंडे, दत्ता पोतदार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या गौरव सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक तांबोळी सिराज व ढगे यांनी परिश्रमपूर्वक नियोजन केले. गावातील पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments