तांबोळी समाजातील विद्यार्थ्यांचा व हज यात्रेवरून परतलेल्या बांधवांचा सत्कार सोहळा २० जुलै रोजी पुण्यात
पुणे : अंजूमन तंबोलीयन जमात महाराष्ट्र राज्य आणि हाशमोद्दीन महंमहद तांबोळी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी व बारावी परीक्षेत 75% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील तांबोळी समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच पवित्र हज यात्रा पूर्ण करून परतलेल्या समाजातील बांधवांचा सन्मान करण्यात येणार आहे.
हा सत्कार समारंभ रविवार, दि. २० जुलै २०२५ रोजी पुण्यातील आझम कॅम्पस येथे पार पडणार असल्याची माहिती अंजूमन तंबोलीयन जमातचे राज्याध्यक्ष उस्मान तांबोळी आणि माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी यांनी दिली.
0 Comments