अवैध सावकारीबाबत तक्रारी दाखल करण्याचे आवाहन
लातूर: (जिमाका) जिल्ह्यातील अवैध सावकरीविरुद्ध प्राप्त तक्रारींवर सावकारांचे निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत कार्यवाही केली जात आहे. वर्षभरात जिल्ह्यातील तालुकास्तरीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे ५५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याबाबत तातडीने कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
अवैध सावकारीविरुद्ध कोणत्याही नागरिकाची तक्रार असल्यास त्यांनी संबंधित तालुकास्तरावर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे किंवा जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर या कार्यालयाकडे तक्रार सादर करावी. तक्रारींच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक सहकरी संस्था एस.व्ही. बदनाळे यांनी कळविले आहे.
0 Comments