केळगाव येथील शिवाजी आश्रम शाळेतील शिक्षक दिगंबर राठोड हे झाले सेवानिवृत्त
केळगाव:(प्रतिनिधी/वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील केळगाव येथील एकलव्य मागास सेवा समिती मानखेड द्वारा संचलित शिवाजी आश्रम शाळा केळगाव येथील शिक्षक राठोड दिगंबर रतनसिंग (महाराज गुरुजी) हे आज सेवानिवृत्त झाले यामुळे त्यांचा सपत्नीक सत्कार करून निरोप देण्यात आला. शिवाजी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा केळगाव तांडा तालुका निलंगा येथे प्रदीर्घ सेवा बजावून आज सेवानिवृत्त झालेले विद्यार्थीप्रिय शिस्तप्रिय शिक्षक ज्यांनी आपल्या अध्यापनात उना हजारो विद्यार्थ्यांना घडवले त्यांना सर्व प्रेमाने महाराज गुरुजी म्हणून बोलावतात. महाराज गुरुजी अगदी हातवारे करून विद्यार्थ्यांना बाराखडी व वाचन हातवाऱ्यावर शिकवत असल्यामुळे त्यांचे पालक वर्गातून नेहमी कौतुक होत असे. आज सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक झाडे बी.आर.प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नामपल्ले एम.पी. पर्यवेक्षक डी बी पासमे, गावचे उपसरपंच सुधाकर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी धोंडीराम चव्हाण,व शिक्षक स्टाफ बालाजी राठोड, राजपाल काळे, सदाशिव चिंचकुटे, पिनाटे सर, पलमटे सर, बुलबुले सर, नरवाडे सर, आनंत गुट्टे, रोंगे मॅडम, मालवाडे मॅडम,सहशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव विठ्ठलराव भिकाने सचिव सचिन शिवाजीराव भिकाने सहसचिव शशिकिरण उत्तमराव भिकाने यांनी सेवानिवृत्त शिक्षक दिगंबर राठोड, महाराज गुरुजी यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments