चाकूरात वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची १०८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चाकूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चाकूर उदगीर रोडवरील वसंतराव नाईक चौकामध्ये जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांच्याहस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करुन ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोर सेना मुख्य प्रचारक अरुण चव्हाण, प्रा.डॉ.बी.डी पवार , मुरलीधर आडे ,जयपाल जाधव, नागेश राठोड , शिवाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान जाधव , सुनिल जाधव ,अनिल राठोड,, ऋषिकेश जाधव, बंटी जाधव, महादेव चव्हाण, विकास जाधव, संदीप राठोड, मंगेश आडे,चेतन राठोड,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments