केळगावच्या पीडित दलित कुटुंबियांची घेतली माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी भेट
केळगाव:( प्रतिनिधी/वसीम मुजावर ) विश्व दलित परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लातूर जिल्ह्याचे माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी निलंगा तालुक्यात केळगाव येथील दलित कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणी त्या कुबातील सर्व सदस्यांची भेट घेऊन अस्तेवाईक पणे चौकशी केली, परिवाराच्या प्रत्येक सदस्यांशी सखोल चौकशी केली व कायदेशीर कायद्याच्या चौकटीत राहून सर्व तपास केला जावा अशी मागणी लहू कांबळे यांनी माजी खासदार डॉ सुनील गायकवाड यांच्या कडे केली. गावामध्ये सर्वांनी शांतता पाळावी असे ही आव्हान केले. या वेळी निलंगा प,स, माजी सभापती अजित माने, युवा भीम सेनेचे संस्थापक पंकज काटे, दयानंद चोपणे, पत्रकार मोहन क्षिरसागर, विलास सूर्यवंशी, रामलिंग पटसाळगे, दिगंबर सूर्यवंशी, गोविंद सूर्यवंशी, अमोल सोनकांबळे, रोहित बनसोडे आदी उपस्थित होते.
0 Comments