कासार सिरसी परिसरातील शेत शिवार रस्त्यांचा आमदार पवार यांच्या हस्ते शुभारंभ
कासार सिरसी:( प्रतिनिधी/फिरोज जागीरदार ) या भागातील कासार बालकुंदा व सरवडी या महसूली विभागातील 68 गावात शेत-शिवार पानंद मुक्ती या अभियानातील दुसऱ्या टप्प्यातील मोहिमेचा दुरदृश्य प्रणाली माध्यमातून औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केली पानंद मुक्ती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात आज कासार सिरसी शिवारातील गिरीश चिंचनचसुरे यांच्या शेतापासून ते जुना वागदरी रस्ता नाकाड्या चा डोंगर ते स्वामी यांच्या शेतापर्यंत तर भरत भेट हत्तर्गा मोडते रामलिंग मुदगड शिवपानंद मुस्लिम कबरस्थान ते इरझरा आशा चौदा किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा यात समावेश आहे या उपक्रमाचे उद्घाटन भाजपा शहराध्यक्ष गोरख ह़ोळकुंदे यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी उपसरपंच बडे साहेब लकड हरे ज्ञानेश्वर वाकडे जिलानी बागवान ग्राम विकास अधिकारी ढोले ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने हजर होता.
0 Comments