खचा-खच प्रवासी भरून जाणारी सिटीबस पोलिसांनी आणली गांधी चौक पोलीस ठाण्यात, वहाकावर गुन्हा दाखल
के.वाय.पटवेकर
लातूर: शहरात रोजच कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी अनेक नियम लातूर जिल्ह्यासह शहरात लागू केलेले आहेत मात्र या कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे सर्रास शहरात पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही यातच महापालिकेने सुरू करण्यात आलेली शहर बससेवा सुरू असून या सिटी बस मध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी बसवून वाहतूक केली जात आहे अशाच प्रकारे आज शुक्रवार दिनांक 21 जानेवारी रोजी सायंकाळी 7:00 वाजण्याच्या दरम्यान गंजगोलाईतून बारा नंबर पाटी कडे खचा-खच प्रवासी भरून जाणारी सिटी बस क्रमांक एम एच 24 ए यु 47 92 ही वाहतूक पोलिसांनी गंज गोलाईतुन गुळमार्केट येथे येताच पोलिसांनी पकडून गांधी चौक पोलीस ठाण्यात आणून लावली आहे सदर सिटी बस मधील प्रवाशांना पोलिसांनी सोडून दिले असून वाहका विरोध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
0 Comments