Latest News

6/recent/ticker-posts

शिरोळ दलित वस्तीतील निकृष्ट रस्त्याच्या चौकशीसाठी तक्रार कर्त्याचं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

शिरोळ दलित वस्तीतील निकृष्ट रस्त्याच्या चौकशीसाठी तक्रार कर्त्याचं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण


शिरोळ:{ प्रतिनिधी/सलीम पठाण } शिरोळ वां.ता.निलंगा येथील अण्णाभाऊ साठे चौकातील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 23 जानेवारी 21 रोजी रस्त्याचं काम चालू होऊन 5 फेब्रुवारी 21 रोजी पूर्ण झालं होतं पण तीन महिन्यातच रस्ता उखडुन गेल्यामुळे सदर कामाची चौकशी व्हावी आणि संबंधितावर कारवाई हवी आणि प्रशासनाने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी गावचे नागरिक इंद्रजीत वामनराव जाधव यांनी वेळोवेळी संबंधित अधिकारी जिल्हा परिषद प्रशासन आणि ग्रामपंचायतला केली होती. पण सदर मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने आणि रस्त्याच्या कामाला वर्ष पूर्ण झाल्याने दिनांक 23 जानेवारी 22 रोजी इंद्रजीत जाधव हे चोवीस तासासाठी दि.23 रोजी सायंकाळी 4:00 वाजता उपोषणाला बसले होते. या संबंधिची चौकशी संबंधित अभियंता राठोड यांना केली असता हा रस्ता दुरुस्ती कालावधीमध्ये असून तो आम्ही दुरुस्त करणार होतो पण ग्रामपंचायत शिरोळने पाणीपुरवठा योजनेसाठी हा रस्ता खोदला असल्याने सदर रस्ता ग्रामपंचायत करून देणार आहे असे सांगितले. ग्रामपंचायत शिरोळ चे ग्रामसेवक माने यांना यासंबंधी विचारले असता सदर कामा वेळी मी नव्हतो आणि यासंबंधीची आपणास कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. उद्या सदस्यांना विचारून सांगतो असे त्यांनी सांगितले. सरपंचांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते गावात उपस्थित नसल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. उपोषण कर्त्यांचे पुतणे ईश्वर जाधव माझी चुलते अनेक व्याधींनी ग्रस्त असून त्यांना शुगर बीपी अनेक व्याधी आहेत तरी उपोषणादरम्यान त्यांना काही हानी झाल्यास ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असेल असे सांगितले. लाक्षणिक उपोषणाची प्रशासनाने दखल नाही घेतल्यास आणि संबंधितावर कारवाई नाही केल्यास 5 फेब्रुवारी 22 पासून जिल्हा परिषद लातूर येथे आमरण उपोषण करण्यात येईल असे उपोषणकर्ते इंद्रजीत जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments