केळगाव येथील शेतकऱ्यांचा विमा नाही मिळाल्यास रस्त्यावर उतरू- एकनाथ काळे
केळगाव येथील शेतकरी अध्यापही पिकविमाच्या प्रतीक्षेत; विमा कंपनीकडून शेतकऱ्याची चेष्टा
【 】जर शेतकऱ्याला विमा भरून सुद्धा विमा मिळत नसेल तर आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करू व विमा कंपनीला विमा देण्यासाठी भाग पाडू- एकनाथ काळे विविध कार्यकारी सोसायटी व्हा. चेअरमन केळगाव
केळगाव:{ प्रतिनिधी/वसीम मुजावर } निलंगा तालुक्यातील केळगाव येथील शेतकरी अद्याप ही पीक विम्याच्या प्रतिक्षेमध्ये बसले आहेत काही शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झाला आहे मात्र सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी अद्यापही या पीक विम्याच्या प्रतीक्षेत बसले आहे. अगोदर शेतकऱ्यांना सोयाबीनचा फटका बसला आहे. हजारो एकर सोयाबीन हे पावसाच्या पाण्यामुळे पुराच्या पाण्यामुळे पाण्यात गेले. काही मोजक्याच शेतकऱ्यांना हे पीक विमा देण्यात आला आहे मात्र प्रशासन ही गप्पच बसले आहे शेतकऱ्यांच्या बाजूने कोण बोलायला तयार नसून शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतक-यांना पीक विमा भरल्यानंतरही तो मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. ज्या शेतकयांनी विमा भरल्यानंतरही त्यांना मिळाला नाही, ते कंपनीचे निलंगा येथील कार्यालयाकडे विचारपूस करण्यासाठी गेले असता कार्यालय बंद दिसून आले तर काही कृषी विभागाच्या वतीने व प्रशासनाच्या वतीने विमा कंपनीचे मोबाईल नंबर दिले आहेत परंतु ते नंबर लागत नाहीत जर लागले तर ते कर्मचारी उडवा-उडवीची उत्तरे देत आहेत. वरिष्ठांचे व सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने या कंपनीकडून शेतकयांची थट्टा मांडली जात असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, तालुक्याच्या ठिकाणी विम्यासंदर्भात तक्रारी सोडविण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे. मात्र, या समितीकडून शेतकऱ्याच्या तक्रारींचे निरसण केले जात नाही. तुम्ही तालुका विमा प्रतिनिधीशी संपर्क साधा म्हणून कार्यालयातून काढता पाय घेण्याचे सांगत आहेत. या दोन्ही कोंडीत शेतकरी अडकला आहे. त्यामुळे अगोदरच ओला दुष्काळ त्यात विमा कंपनीकडून थट्टा केली जात असल्याने शेतकयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. लवकरात लवकर उर्वरित केळगाव येथील शेतकऱ्यांचा पिक विमा वाटप करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा केळगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीचे व्हा. चेअरमन एकनाथ काळे सह संचालक मंडळ व शेतकऱ्यांनी दिला आहे.
0 Comments