आधार प्रतिष्ठान भादाकडून जि प प्रशालेस आवश्यक शैक्षणिक साहित्याची भेट
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा जि प प्रशाला आधार प्रतिष्ठान आणि आधार बचत गट भादाकडून शालेय गरजू विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त आवश्यक शालेय साहित्य आणि विविध स्पर्धा परीक्षा संदर्भातील पुस्तकांची उपलब्धता करून देण्यात आली आणि पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अक्षर स्पर्धा परिक्षा तथा विविध बोर्ड परीक्षा संदर्भात योग्य सखोल मार्गदर्शन लाभावे याकरिता अवश्यक असे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले. या कामी या प्रशालेतील शिक्षक जगताप, नागापुरे आणि मुख्याध्यापक रमेश आनंतवार यांनी सहकार्य केले. तसेच शाळेमध्ये आवश्यक लागणाऱ्या शैक्षणिक साहित्य आणि मुलांच्या उज्वल आणि स्पर्धात्मक भविष्यासाठी उपयुक्त असे शैक्षणिक पुस्तकांची उपलब्धता करून देण्याकरिता आधार प्रतिष्ठानला सहकार्य केले. यामुळे आधार प्रतिष्ठानने २६ जानेवारी २०२२ रोजीचे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेला शैक्षणिक साहित्य भेट दिले आहे. कारण आतापर्यंत आधार प्रतिष्ठानने शेती आणि आरोग्य क्षेत्रांमध्ये भरीव असे कार्य केले असून केवळ शैक्षणिक क्षेत्र शिल्लक होते याकरिता शिक्षण क्षेत्रांमध्ये ही कार्य करण्याची आधार प्रतिष्ठानची इच्छा होती ती यावेळी काही प्रमाणात फलित झाली आहे. या कार्यक्रमासाठी शालेय समिती अध्यक्ष अर्जुन लटूरे, भादा सरपंच मिनाबाई दरेकर, उपसरपंच बालाजी शिंदे, मुख्याध्यापक रमेश आनंतवार आणि शिक्षक जगताप, नागापुरे उपस्थित होते. तसेच आधार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पूजा आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे उपाध्यक्ष मनोज आर पाटील, सचिव रियाजोद्दीन सी खोजे, कोषाध्यक्ष बालाजी दे उबाळे, सदस्य प्रशांत अ पाटील, मनोज प्र उबाळे, गोरख ध बनसोडे, दीपक म मानधने, लखन पां लटुरे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी चेरमन दत्तकुमार शिंदे, ग्रा प सदस्य अमोल पाटील, ग्राम विकास अधिकारी माणिक सूर्यवंशी आणि शाळेतील शिक्षिका, शिक्षक स्टाफ उपस्थित होता.
0 Comments