पोलिस अधीक्षकांनी गौरव ज्ञानेश्वर कांबळे या होतकरू व जूनियर आय.ए.एस. परीक्षेमध्ये टॉप करणाऱ्या विद्यार्थीच्या घरी भेट देऊन केले कौतुक
लातूर: पोलिस अधीक्षकांनी सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू व जूनियर आय.ए.एस. परीक्षेमध्ये टॉप करणाऱ्या विद्यार्थीच्या घरी भेट देऊन केले कौतुक याबाबत थोडक्यात माहिती अशी की, आज रोजी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी विलास नगर, लातूर येथे राहणारे व अत्यंत गरीब कुटुंबातील मुलाने डॉ.जहांगिर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा व ज्युनियर आयएएस मध्ये टॉप केल्याने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्ष अनुराग जैन, परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख हे स्वतः विलास नगर येथे राहणारा व यशवंत विद्यालय लातूर येथे इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत असलेला गौरव ज्ञानेश्वर कांबळे, वय 13 वर्ष याच्या घरी जाऊन त्याचा सत्कार करून कौतुक केले. गौरव ज्ञानेश्वर कांबळे यांचे वडील लातूर महानगरपालिका,येथे घंटागाडीवर काम करतात. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये पण ज्ञानेश्वर कांबळे यांनी मुलाच्या शिक्षणामध्ये कोणतीही कमतरता भासू दिली नाही. तसेच मुलगा गौरव यानेही त्याचे चीज करत डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा व ज्युनियर आय.ए.एस. परीक्षेत टॉप केले आहे. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची ही कामगिरी सर्वांना प्रेरणादायी आहे. छोट्याश्या गौरवला आतापासूनच अभ्यासाची आवड लागलेली आहे. त्याचे कौतुक करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. एकीकडे पालकांना मुलांसाठी वेळ मिळत नसल्याने दुर्लक्षित मूलं हुशार असूनसुद्धा गुन्हेगारी कडे आकर्षित होताना दिसत आहेत. दुसरीकडे जेम तेम परिस्थिती असूनसुद्धा काही पालक हे आपल्या मुलांच्या शिक्षणात रस घेऊन त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी घंटागाडीवर काम करून त्याला चांगले शिक्षण देण्याचे प्रयत्न करत आहेत. योग्य आदर्श या मुलांमध्ये बिंबवण्याची आवश्यकता आहे आणि ती जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. असेही आवाहन पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी सर्वांना केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख, विवेकानंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर उपस्थित होते. सर्वांनी गौरव कांबळे याचे कौतुक केले.
0 Comments