Latest News

6/recent/ticker-posts

वातावरणातील बदलाने झाला तेजोमय सूर्य निस्तेज

वातावरणातील बदलाने झाला तेजोमय सूर्य निस्तेज


बी डी उबाळे

औसा: तालुक्यामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणातील मोठ्या बदलामुळे दिवसभर धुके पडण्याचे प्रमाण सुरू असल्याचे औसा तालुक्यामध्ये दिसून आले. यामुळे या धुक्‍याने रब्बी पिकावर मोठा दुष्परिणाम होत असल्याचे जाणवत आहे. कारण सध्या अनेक ठिकाणी हरभरा ज्वारी गहू करडई आदी पिके फुले आणि मोहर भरण्याच्या अवस्थेमध्ये असताना या धुक्याचा दुष्परिणाम होऊन निश्चितच येणाऱ्या उत्पन्नावर मोठा आघात होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर याच धुक्याने खरिपामध्ये तूर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून व त्याने ही अगदी कमी प्रमाणात शेती माल निघाला. यामुळे आता रब्बी पिकाची अवस्था काय असणार ? आहे. असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. तर बारमाही तेजोमय असणारा सूर्य अग्नी निस्तेजपणे मावळतीला जात असल्याचे चित्र औसा तालुक्यातील भादा व परिसरामध्ये दिसून आले.

Post a Comment

0 Comments