Latest News

6/recent/ticker-posts

माचरवाडी(भालकेवाडी) येथे अखंड हरिनाम सप्ताह

माचरवाडी(भालकेवाडी) येथे अखंड हरिनाम सप्ताह


निलंगा: तालुक्यातील माचरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 10 वें. ची सुरुवात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही करण्यात आली आहे. व्यासपीठ अधिकारी ह.भ.प. सतीशजी महाराज लातूरकर आळंदी देवाची यांच्या व ग्रामस्थांच्या प्रेरणेतून ठेवण्यात आलेल्या या सप्ताहामध्ये सकाळी चार ते सहा काकडा सहा ते 7 विष्णू सहस्त्र नाम, सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण दहा ते बारा गाथा भजन, दोन ते पाच संमिश्र भागवत कथा पाच ते सात हरिपाठ नऊ ते अकरा किर्तन हरिजागर असा क्रम सप्ताहाचा ठेवण्यात आला आहे. दिनांक 26 जानेवारी रोजी गुरुवर्य ह.भ.प.वीरनाथ महाराज लड्डा निटूर यांचे कीर्तन, दिनांक 27 जानेवारी रोजी ह.भ.प. जीवन महाराज, आरी यांचे कीर्तन दिनांक 28 रोजी रामाचार्य ह.भ.प. गणेश जी महाराज सोनवणे लातूर दिनांक 29 रोजी बाल योगी हरिहर जी महाराज दीवेगावकर दिनांक 30 रोजी विनोदाचार्य  ह.भ.प.भरतजी महाराज जोगी परळी वैजनाथ, दिनांक 31 रोजी ह भ प शरद महाराज जकेकुरकर, दिनांक 1 फेब्रुवारी रोजी भागवताचार्य मनोहर जी महाराज कातकडे तर यांचे कीर्तन राहणार आहेत. तर दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते बारा पर्यंत गुरुवर्य महंत बाबा महाराज भाटेपूरी कर यांची काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे. यासाठी समस्त ग्रामस्थांच्या वतीने परिसरातील सर्व खेड्या-पाड्याच्या भक्त मंडळींनी कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments