छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदात्याचा प्रत्येकी 2.50 लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात जोखीम विमा पॉलीसी
नळेगाव: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने गेल्या 23 वर्षापासून सातत्याने आयोजित करण्यात येत असलेले दि. 19 फेब्रुवारी 2022 वार शनिवार रोजी सकाळी ठीक 9:00 वा. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा प्रत्येकी 2.50 लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात जोखीम विमा पॉलीसी काढण्यात येणार आहे. विमा प्रतिनिधी दिपक शिरूरे(युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड) व बुलढाणा अर्बन क्रेडीट सोसायटी नळेगाव, आडत व्याअपारी असोशिएशन, आडत लाईन, मार्केट कमिटी नळेगाव,जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब नळेगाव, जीप चालक मालक संघटना नळेगाव, संभाजी सेना नळेगाव यांच्या सौजन्याने विमा पॉलिसी काढण्यात येणार आहे. तरी ईच्छुक रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये रक्तदान करावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, नळेगाव, अनिलभैय्या चव्हाण व मित्र परिवार तर्फ करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या आधार कार्डाची झेरॉक्स प्रत सोबत आणावी. रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्राचे वितरण तात्काळ शिबिरात वाटप करण्यात येणार आहे. तरी ईच्छुक रक्तदात्यांनी आपल्या नावाची नोंदणी डॉ. बालाजी पांचाळ, स्पंदन क्लिनिक मेन रोड नळेगाव, हॉटेल वसुंधरा बार & रेस्टॉरंट नळेगाव कॉर्नर, सरस्वती भांडी स्टोअर्स, मेन रोड नळेगाव, दामिनी पान स्टॉल व अक्षता पान स्टॉल, बस स्टँड शेजारी, मेन रोड नळेगाव, जय महाराष्ट्र पान स्टॉल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नळेगाव येथे करावी व रक्तदान करून खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करावी. शिबिराचे ठिकाण श्रीअष्टविनायक मेडिकल अँड जनरल स्टोअर्सच्या समोर, येरोळकर कॉम्पलेक्स, मेन रोड,नळेगाव येथे करावी.
0 Comments