भादा येथे आठवडी बाजाराची जय्यत तयारी
बी डी उबाळे
औसा: मागील अनेक वर्षापासूनची भादेकरांची आठवडी पशुधन बाजार भरावा ही अपेक्षा आता पूर्णत्वास जात असून उद्या दिनांक 9 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी भादा येथे प्रथम आठवडी बाजार भादा-औसा रोड भादा येथे भरविण्यात येणार असल्याने त्याची जय्यत तयारी सुरू असून याचा भादा ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी, उपसरपंच बालाजी शिंदे यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करत हा बाजार भरवीत आल्याचे सांगितले. यावेळी भादा येथील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments