कर्नाटकात हिजाबाला विरोध तर निलंग्यात हिजाबच्या समर्थनार्थ एक दिवसीय धरणे आंदोलन; महिलांचा मोठा सहभाग
निलंगा: कर्नाटक राज्यामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना हिजाब घालवून महाविद्यालयात प्रवेश केल्याने तेथिल काही समाजकंटकांनी विरोध करत महाविद्यालयाच्या बाहेर करून मज्जाव घालण्यात आले होते. हिजाबाला विरोध केल्याची बातमी पसरताच देशभरातील अनेक पुरोगामी विचारांच्या पक्षाने व मुस्लिम संघटनांनी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्याच धर्तीवर कर्नाटक राज्याच्या सीमेला लागून असलेल्या महाराष्ट्र राज्यातील निलंगा शहरांत उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर "हिजाबे हिंदुस्ता" च्या नावाने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा मोर्चा महिलांनी संभाळत केंद्र सरकारच्या व कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. बेटी पढाव बेटी बचाव ची भाषा करणारे आपल्या आपल्या आठरा पगड जातीच्या लोकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कर्नाटकात झालेली मुस्लिम विद्यार्थ्यांवर अन्याय ची बातमी समजली नसेल का? संविधानाने दिलेल्या कलम अधिनियम १९ च्या अंतर्गत सर्वांना काय बोलावं, काय खावं, कशे जगावं, काय परिधान करावं हे स्वतंत्रपणे ज्याच्या त्याच्या अधिकार राज्यघटनेने दिलेले असताना हिंदू मुस्लिम, मस्जिद मंदिर, हिंदुस्तान, पाकिस्तान अशे विषय समोर आणून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केंद्र सरकार कधी करणार? देशात दिवाळी असो की रमजान ईद हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने श्वास घेतात तरीही काही समाजकंटक जाणूनबुजून समाजामध्ये धर्मा-धर्मात द्वेष पसरवण्याचा कारस्थान जोमात सुरू आहे निवडणुका सोमर येताच भावनिक मुद्दे जातीवर आणून समाजाच्या विविध जाती धर्माचा तिरस्कार केला जातो. ह्यापुढे अश्या जाती जातीत धर्मा-धर्मात द्वेष पसरवण्याचा काम करत असाल तर आम्ही सर्व पुरोगामी विचारांचा लोकं एकत्र येऊन जश्याच्या तश्या उत्तर दिले जाईल अशी आक्रोश भावना उपस्थित आंदोलनास महिलांनी व्यक्त केल्या. अश्या लोकांना संविधान मान्य नाही हे त्यांच्या कृतीवरून दिसून येतो तसेच असंवैधानिक कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन देशाचे महामहिम यांना उपजिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनावर सुमैय्या पठाण, फरहान नूर उझ्मा, हजरा शेख, समरीन अन्सारी, सय्यद शहेजाद, मणियार उमेरा, शेख आसमा, अंजूम लालदेकडे, मदिहा बागवान, मिशाक्षीताई निंबाळकर, विद्या बनसोडे, भारतताई कदम, समीना पठाण, सह हजारो महिला विद्यार्थी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या एक दिवसीय धरणे आंदोलनात मौलाना मुफ्ती रिजवान साहाब,महाराष्ट्र चे प्रवक्ते मोहसिन खान, कांग्रेस नेते अभय साळुंके, आरपीआय चे विलास सूर्यवंशी, ओबीसी नेते दयानंद चोपणे, विजयकुमार पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे इस्माईल लदाफ, शहर अध्यक्ष धम्मानंद काळे, वंचित आघाडी चे युवराज जोशी, जेष्ठ समाजसेवक नसीमोद्दीन खतीब, टिपूसुल्तान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर, सबदर कादरी, एमआयएम चे सय्यद शारूख सर्व समाजातील पक्षांतील नेत्यांची आवर्जून उपस्थितिथी होती. या एक दिवसीय हिजाबे हिंदुस्ता धरणे आंदोलन यशस्वी होण्यासाठी मुजीब सौदागर, सबदर कादरी, खदीर मासुलदार, मुजमम्मील खादरी, साबेर चाऊस, वसीम सय्यद, उमर फारुख औसेकर आदी परिश्रम घेतले. अनेकांनी दिल्या जाहीर पाठींबा. "हिजाबे हिंदुस्ता" या एकदिवसीय धरणे आंदोलनाला कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित आघाडी, शेर-ए हिंद टिपूसुल्तान संघटना, वीर लहुजी शक्ती सेना, एमआयएम, जन मोर्चा आंदोलन, स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषद, जमाते उलेमा-ए-हिंद संघटना, आदींनी जाहीर पाठिंबा दिला.
0 Comments