दोन वर्षे जनसेवेची,महाविकास आघाडीची,हा संदेश घेवून लातूर एक्सप्रेस पोहचली रेल्वेस्थानकावर!
के.वाय.पटवेकर
लातूर: दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची, हा संदेश घेवून लातूर एक्सप्रेस शिक्षण पंढरी लातूर शहरात आज बुधवार दि.९ फेबु्रवारी रोजी सकाळी लातूरच्या रेल्वेस्थानकावर दाखल झाली आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी आणि लोकोपयोगी योजनांची माहिती या रेल्वेच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या लोक कल्याणकारी योजनांची आणि आजपर्यंत केलेल्या कामांची माहिती या सजवलेल्या रेल्वेच्या माध्यमातून लोकांना देण्यात येत आहे. या रेल्वेगाडीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या छायाचित्र आणि नावांचा उल्लेख आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक आश्वासक नेतृत्व असून संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेत पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्र देशातले एकमेव राज्य असल्याचा उल्लेख रेल्वेवर रेखाटण्यात आलेल्या जाहिरातीत केलेला आहे. शिवाय आरोग्य आणि सेवा कार्याचाही यात समावेश आहे. केले विक्रमी लसीकरण, झाले कोरोनापासून संरक्षण, आपला महाराष्ट्र, आपले सरकार असे बरेचकाही या विशेष रेल्वेगाडीवर रंगवण्यात आलेले आहे.
0 Comments