Latest News

6/recent/ticker-posts

देवणी येथे "जल पे चर्चा" कार्यक्रम उत्साहात

देवणी येथे "जल पे चर्चा" कार्यक्रम उत्साहात



देवणी:(प्रतिनिधी/ विक्रम गायकवाड) महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व कृषी विभाग देवणी यांच्या वतीने दि. 08 फेब्रुवारी 2022 रोजी देवणी येथील विवेक वर्धिनी महाविद्यालयात सर्वांनी कोवीड अनुरूप नियमावलीचे काटेकोर पालन करून "जल पे चर्चा" या विषयावर चर्चासत्र आयोजित केला. यावेळी VSTF अभियानाचे देवणी तालुका समन्वयक सागर तापडिया यांनी मान्यवरांचे स्वागत, सत्कार करून ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची सविस्तर ओळख करून दिली. तसेच जलशक्ति अभियानातील विविध घटकांचे महत्त्व युवा पिढीला अवगत व्हावे याकरिता जलशक्ती अभियानाची सुद्धा ओळख युवक-युवतींना करून दिली. यानंतर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक अतुल माने सर(मंडळ कृषि अधिकारी, कृषी विभाग- देवणी) यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या बाबतीत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. 
तसेच त्या योजनांचा लाभ घेण्याच्या अटी व शर्ती यांची सुद्धा सविस्तर माहिती दिली. यामध्ये पाणलोट क्षेत्र म्हणजे काय?, जलपुनर्भरण(रेन वॉटर हार्वेस्टिंग), वृक्षारोपण/वनीकरण, बोअरवेल/विहीर पुनर्भरण, नदी खोलीकरण, जुन्या जलसंरचनांचे पुनर्जीवन करणे, सलग समतल चर, खोल सलग समतल चर, कंपार्टमेंट बंडींग, ढाळीचे बांध, समतल मशागत, इ. अनघड दगडांचे बांध, लहान माती नालाबांध, गॅबियन बंधारे, शेततळे, माती नालाबांरे, सिमेंट नालाबांध, इ.लोकसहभाग व त्याचे महत्व.
याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनी पाण्यासंबंधी खुली चर्चा केली. यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचे गावातील अनुभव व त्यांच्या गावात झालेली कामे सांगितले. तसेच त्यांनी पाण्याच्या संवर्धनासाठी काही उपाय सुचविले. यात नदीतील वाळू उपसा कमी करणे, वृक्षतोड कमी करून वृक्षारोपणात वाढ करणे, पाण्याचा पुनर्वापर, ठिबक/तुषार सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करणे, पाण्याची टाकी भरल्यावर अलार्म बसविणे असे उपाय त्यांनी सुचविले. तसेच त्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांचे निरसन उपस्थित सर्व मान्यवरांनी केले.
शेवटी तालुका समन्वयक सागर तापडिया यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली .
यावेळी अतुल माने(मंडळ कृषी अधिकारी कृषी विभाग, देवणी), शिवप्रसाद वलांडे(कृषी अधिकारी देवणी), डब्ल्यू. एस. कांबळे(प्राचार्य, विवेक वर्धिनी महाविद्यालय देवणी), प्राध्यापक दाभाडे, अचवलकर, महेश काळे, विक्रम गायकवाड़, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments