Latest News

6/recent/ticker-posts

लातूर शहरातील अवंतीनगर येथील थरारक घटना: पतीने पत्नीचा सुर्‍याने गळा चिरून केला निर्घृण खून !

लातूर शहरातील अवंतीनगर येथील थरारक घटना: पतीने पत्नीचा सुर्‍याने गळा चिरून केला निर्घृण खून !


के.वाय.पटवेकर

लातूर: पतीने सासरवाडीत येवून पत्नीचा अत्यंत निर्दयीपणे गळा चिरून खून केल्याची थरारक घटना आज ८ फेबु्रवारी रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान बार्शी रोडवरील गॅँड हॉटेलच्या पाठीमागील अवंतीनगर येथे घडली आहे. मयत विवाहितेचे नाव  रेशमा अब्दुल शेख वय २० वर्षे असल्याचे समजते. खूनाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. रेश्मा हिचा विवाह तीन वर्षांपूर्वी अब्दुल शेख याच्याशी झाला होता. त्यांना एक तीन वर्षाचा मुलगा आहे. मात्र अब्दुलला दारुचे व्यसन होते. तो सतत पत्नीवर संशय घेत होता आणि वारंवार मारहाण करून छळ करीत होता, जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. त्यामुळे रेश्मा माहेरी अवंतीनगर येथे राहत होती. रेश्माच्या आई-वडिलांनी वेळोवेळी आपल्या जावयाची तक्रार पोलिसांत केली होती. मात्र पोलिसांनी दखल घेतली नसल्याने माझ्या मुलीचा जिव गेला. अशी उद्विग्न प्रतिक्रिया मयत मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. आज ८ फेबु्रवारी रोजी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान रेश्माचा पती अवंतीनगर येथे सासरवाडीत आला. पती-पत्नीत भांडण झाले. त्याचवेळी अब्दुल याने सूरा घेवून पत्नीचा गळा चिरून तिचा खून केला आणि काही वेळातच तेथून फरार झाला. या घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मयत विवाहितेचा मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Post a Comment

0 Comments