Latest News

6/recent/ticker-posts

पिक विम्याच्या मागणीसाठी केळगाव येथील शेतकरी बांधवांच्या वतीने निवेदन

पिक विम्याच्या मागणीसाठी केळगाव येथील शेतकरी बांधवांच्या वतीने निवेदन


निलंगा: तालुक्यातील केळगाव येथील शेतकऱ्यांना अध्यापही पिक विमा नुकसान भरपाई भेटली नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे आज केळगाव येथील शेतकरी बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, निलंगा तालुक्यातील केळगाव येथे 2021 या खरीप हंगामातील पीक विमा अनेक शेतकऱ्यांनी भरला होता मात्र 10 ते 20 टक्के शेतकऱ्यांची नावे या पिक विमा व नुकसान भरपाईच्या यादीमध्ये आली आहेत व यांचे वाटप व त्यांना झाले आहे मात्र उर्वरित 70 ते 80 टक्के शेतकरी आणखी यादी मध्ये नाव आलेले नसून त्यांना पिक विमा वाटप झाला नाही कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याने पिक विमा कंपनीची नवीन संकट उभे केले आहे. आज केळगाव येथील शेतकरी बांधवांच्या वतीने निलंगा तहसील कार्यालय व कृषी कार्यालय निलंगा येथे निवेदन करून पीक विम्याची व नुकसानभरपाईचे लवकरात लवकर मंजुरी मिळावी व वाटप करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी शेतकरी मदार मागणे, तुराब मुजावर, शिवाजी कांबळे, अफसर पटेल, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन एकनाथ काळे, सर्व शेतकरी बांधव उपस्थित राहून पीक विम्याची मागणी केली आहे जर पिक विमा लवकर मंजूर नाही झाला तर कृषी कार्यालय व तहसील समोर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

Post a Comment

0 Comments