Latest News

6/recent/ticker-posts

निटूर(मोड) व डांगेवाडी शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या निवडी

निटूर(मोड) व डांगेवाडी शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या निवडी


निटूर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निटूर(मोड) च्या शालेय शिक्षण व्यवस्थापन समीती वर अनिल गायकवाड यांची अध्यक्ष पदी तर सुनिल राठोड यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली. यावेळी लतिफ चाऊस, इमाम सरदार, श्रावण शिंदे, सुधाकर हासबे, बाळु हासबे, नवनाथ बुडगे, सुदाम साळुंखे, बंडु हासबे, साबेर चाऊस, पुनित चव्हाण आदी उपस्थित होते. सदर शाळेचे शिक्षक रुंजे, पाटील, यांनी नुतन पदाधिकारी निवडीचे स्वागत केले. तर माजी अध्यक्ष हसन माडिवाले यांनी आभार व्यक्त केले.

अध्यक्षपदी गोपाळ सोनटक्के तर उपाध्यक्षपदी संगमेश्वर डांगे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डांगेवाडी च्या शालेय शिक्षण व्यवस्थापन समीतीच्या अध्यक्षपदी गोपाळ सोनटक्के व उपाध्यक्षपदी संगमेश्वर डांगे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी नितीन डांगे, बालाजी सुडे, सुनील लोहरे, सतीश सोनटक्के, ईश्वर डांगे व शाळा कमेटीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक मुळे यांनी नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे स्वागत केले.

Post a Comment

0 Comments