बेलकुंड येथून मोटरसायकल चोरीस;पोलीसात गुन्हा दाखल
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील बेलकुंड येथील मोटरसायकल चोरीस गेल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बेलकुंड तालुका औसा येथील पोलीस चौकी च्या जवळपास असणारे केशवराव हे हॉटेल यांच्यासमोर खंडू केशव उबाळे यांची निळ्या रंगाची मोटरसायकल 2007 मॉडेल अंदाजित किंमत 15 हजार रुपये असून ती मोटारसायकल MH24 Q6797 ही दि. 10 रात्री ते 11 फेब्रुवारी 2022 रोजी पहाटेच्यावेळी चोरीस गेल्याने भादा पोलिस ठाण्यांमध्ये शनिवार दिनांक 12 फेब्रुवारी 2022 रोजी 26/2022 कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भादा पोलीस करीत आहेत.
0 Comments