लातुरातील आंदोलनकर्त्या एसटी कर्मचार्यांच्या पँडॉलसमोर आली कडकलक्ष्मी...पोतराजांनी स्वताला आसूड मारून मागितले दान
के वाय पटवेकर
लातूर: आली कडकलक्ष्मी आली म्हणत डोक्यावर मरीआईचा रथ घेवून दान मागत स्वताच्या अंगावर आसूडाचे सपा-सप वार करून आपली उपजिवीका भागवणार्या काही पोतराजांनी आज १२ फेब्रुवारी रोजी दुपारी लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या साडेतीन महिन्यांपासून दुखवटा आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचार्यांच्या पँडोलसमोर स्वताच्या अंगावर कोडे मारून घेवून दान मागितले. आणि तीन महिन्यांपासून पगार नसलेल्या एसटी कर्मचार्यानी देखील पोतराजाना अगदी आस्थेने दान दिले. एसटी कर्मचार्यांनी आपल्या व्यथा, वेदना सहन करीत शासनात विलीनीकरणासाठी सरकारवर आंदोलनाचा आसूड उगारलेला आहे. मात्र सरकार विलीनीकरणाची मागणी काही पदरात टाकताना दिसत नाही.
0 Comments