शिरोळ येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर
शिरोळ:{प्रतिनिधी/सलीमभाई पठाण} आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जि. प.लातूर आणि ग्राम संजीवनी प्रतिष्ठान अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 11 रोजी मौजे शिरोळ येथे शिबिर पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच प्रताप पाटील हे होते. गावातील तरुण युवकांनी आपत्ती व्यवस्थापन कसे करायचे ऊन,वारा,पाऊस,वादळ,पूर अशा प्रकारच्या आपत्ती आल्यास काय उपाययोजना करायच्या नदीकाठच्या गावांना पूरपरिस्थिती च्या वेळेस आपत्ती निवारण कशी करायची याचा सखोल मार्गदर्शन प्रतिष्ठानचे कार्यकर्ते समाधान कडू यांनी केले. याप्रसंगी आशा कार्यकर्त्या मुक्ता जाधव, सुरेखा कांबळे, अरविंद कदम, काशिराम जाधव, सलीम पठाण, विवेक जाधव, जलील सय्यद, ज्ञानोबा कजेवाड उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिरोळचे तलाठी विष्णु पोचापुरे यांनी विशेष प्रयत्न केले त्यांना ग्रामपंचायतच्या कर्मचार्यांनी मोलाची साथ दिली.
0 Comments