सार्वजनिक शिवजयंती कार्यकारणी जाहीर
शेख बी जी
औसा: दि.11 शहरात मुस्लिम समाजाकडून प्रतिवर्षी उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते यावेळीही ती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक शिवजयंती 2022 अध्यक्ष पदी अॅड फिरोज पठान तर कार्याध्यक्षपदी पदि अॅड मजहर शेख याची निवड करण्यात आली. दिनाक 10/02/2022 रोजी झालेल्या बैठकित छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त गेल्या 14 वर्षा पासून औसा शहरात हिंदू मुस्लिम एकात्मतेची प्रतीक दर वर्षी मुस्लिम समाजातर्फे शिव जयंती चे आयोजन केले जाते. याही वर्षी शिव जन्मोत्सव साजरा करण्याचा निर्णय मुस्लिम समाजा तर्फे घेण्यात आला त्यासाठी काल दिनाक 10/02/2022 रोजी बैठक झाली सदर बैठकीत अध्यक्ष पदी अॅड. फेरोज पठाण यांचे तर उपाध्यक्ष पदी हाजी शेख, कार्याध्यक्षपदी पदी अॅड. मजहर शेख, सचिव पदी इलहाज पटेल, कोषाध्यक्ष पदी अॅड. मुस्तफा (वकिल) इनामदार यांची एकमताने निवड करन्यात आली. निवड झालेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले जात आहे. या कार्यकारणीकडून उत्तम रित्या शिवजन्मोत्सव साजरा केला जाईल आशा अपेक्षा बाळगल्या जात आहेत.
0 Comments