स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीनिमित्त निलंगा येथे रक्तदान,वृक्षारोपण शिबिर
निलंगा: स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा मध्ये वृक्षारोपण रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकरसाहेब(सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांनी केले. या रक्तदान शिबिरात एकूण 93 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर साहेब व अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र विद्यालय निलंगा चे मुख्याध्यापक पाचंगे सरांनी रक्तदान केले यावेळीमाजी नगराध्यक्ष सुनीताताई चोपणे, डॉ.लालासाहेब देशमुख ,प्राचार्य डॉ कोलफुके, उपप्राचार्य प्रा प्रशांत गायकवाड, यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली. यासाठी प्राचार्य.डॉ. भागवत पौळ, प्राचार्य डॉ.एस. एस. पाटील, प्रा. गजेंद्र तरंगे, प्रा ठाकरे व संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. रक्तदान शिबिरासाठी भालचंद्र ब्लड बँकचे दिगम्बर पवार , सौ पूजा शिंदे, जयप्रकाश सूर्यवंशी, फरहान शेख, संजय ठाकूर, नितीन क्षिरसागर व अन्सार शेख यांची उपस्थिती होती. सर्वांनी सामूहिकरित्या समाधी स्थळी दर्शन घेतले.
0 Comments