सामान्य नागरिकांना फसवणाऱ्या आरोपीच्या नेरूळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नेरूळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई
के वाय पटवेकर
नवी मुंबई: वाशी न्यायालयाने त्यांच्याकडील कोर्ट केस क्रमांक आरसीसी 658/ 2019 भा द वि कलम 420 406 मधील फरार आरोपी विलास उर्फ विकास नरसु पाटील वय 52 वर्ष याचे वर अजामीनपात्र अटक वारंट जारी केले होते. त्या अनुषंगाने श्याम शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेरूळ पोलीस ठाणे नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय कागणे आणि हेडकॉन्स्टेबल रशिद युसुफ पटवेकर यांच्या पथकाने नमूद आरोपीस त्याच्या मोबाईल कॉल डिटेल्स वरून व गुप्त बातमी दारामार्फत त्यास सीबीडी रेल्वे स्टेशन वेस्ट बाजूकडे सापळा लावून त्यास शिताफतिने ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत, आरोपी विलास पाटील राहणार होनीगाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे हा सिडको परिसरात सामान्य नागरिकांना हेरून घर देण्याच्या बहाण्याने व अन्य कारणाने फसवणूक करीत असे. आरोपी हा सराईत असून तो नेहमी आपले अस्तित्व लपवून व आपले राहण्याचे ठिकाण बदलून आपण पकडले जाऊ नये यासाठी तो फरार राहायचा. परंतु पोलीस पथकाने त्यास सापळा लावून शिताफतीने अटक केली आहे. नमूद केलेल्या कारवाईबद्दल नेरूळ पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

0 Comments