Latest News

6/recent/ticker-posts

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; हसेगाव वाडी येथील घटना

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; हसेगाव वाडी येथील घटना


बी डी उबाळे

औसा: लातूर जिल्ह्यातील हासेगाववाडी येथील एका शेत मजुराचा वीज पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंकुश कांबळे (वय ३५) अस मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आज साडे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

औसा तालुक्यातील हासेगाववाडी येथील युवराज नारायण जोगदंड यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्या विहिरीवर लोखंडी सिमेंटचे कडे टाकण्याचे काम सुरू होते.आज गुरुवार दि 19 मे 2022 रोजी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वारे सुरू झाले. दरम्यान याच विहिरीवर कन्हेरी येथील ३५ वर्षीय ज्ञानेश्वर अंकुश कांबळे हा शेतमजूर कामाला होता. याचा वीज पडून जागीच त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Post a Comment

0 Comments