Latest News

6/recent/ticker-posts

निटूर सोसायटी च्या चेअरमन पदी कालिदास पाटील तर व्हाईस चेअरमन पदी दिनकर निटूरे यांची बिनविरोध निवड

निटूर सोसायटी च्या चेअरमन पदी कालिदास पाटील तर व्हाईस चेअरमन पदी दिनकर निटूरे यांची बिनविरोध निवड


निलंगा/प्रतिनिधी (दि.25) : निटूर सोसायटी ही निलंगा तालुक्यातील दसऱ्या क्रमांकाची मोठी सोसायटी असुन या सोसायटीत निटूर, ताजपुर, बुजरूकवाडी, डांगेवाडी, भालकेवाडी,   ढोबळेवाडी आदी गावांचा समावेश आहे. मागील पंचवार्षिक कालावधीत सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा लातूर जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनात सोसायटीने चांगले कामकाज केल्याने शेकऱ्यांनी पुन्हा 2022 ते 27 या पंचवार्षिक साठी चेअरमन कालिदास वसंतराव पाटील व व्हाईस चेअरमन दिनकर रंगराव निटूरे यांना बिनविरोध निवडून दिले. निटूर सोसायटीची निवडणुक निलंगा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक तथा व्हा चेअरमन दिनकर (नाना) निटूरे यांच्या नेतृत्वात बिनविरोध झाली. 


नवनियुक्त संचालक मंडळाची पहिली सभा दि. 25 मे 2022 रोजी संस्थेच्या कार्यालयात पार पडली. यावेळी कालिदास वसंतराव पाटील यांची चेअरमन पदी तर दिनकर रंगराव निटूरे यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी डी. एन. जाधव यांनी केली. यावेळी के. एल. सुर्यवंशी, एल. व्ही. कुलकर्णी व संस्थेचे गटसचिव एम. बी. कांबळे साहेब यांनी सहकार्य केले. या नवनियुक्त संचालक मंडळात सर्वसाधारण गटातून सूर्यकांत नामदेव निटूरे, संदिप विलास पाटील, गोविंद नामदेव देशमुख, सुरेश व्यंकटराव सुर्यवंशी, कुमार चंदरराव सोमवंशी, बालाजी बाबुराव धुमाळ, अनुसूचित जाती जमाती गटातून निवृत्ती श्रीपती शिंदे, महिला प्रतिनिधी गटातून सुलतानाबी हैदर मोमीन, लक्ष्मीबाई प्रभु लक्षटे, विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून गहिनीनाथ हणमंतराव सेलूकर, इतर मागासवर्गीय गटातून रमेश पांडुरंग हुलसुरे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. नवनियुक्त चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाचा सादनाथ मंदिर कमिटीच्या वतीने पंकज कुलकर्णी, राजकुमार सोनी, विजयकुमार देशमुख, संगमेश्वर करंजे, नंदकुमार हासबे आदींनी सत्कार केला.


यावेळी अंगद निटूरे, भरत उकळे, शब्बीर शेख, बलभीम तेलंगे, प्रसाद बुडगे, विठ्ठल भोईबार, साहेबराव भोईबार, सोमेश्वर लासुरे, निवृत्ती घोरपडे, देविदास निटूरे, ज्ञानोबा पाटील, भानुदास पाटील, उत्तम पाटील, वसंत भोईबार, जब्बार चाऊस, गणेश भुरे, भरत कवडगावे, भरत निटूरे, पांडुरंग नाईक, शिवाजी बाबर, संजय शिंदे आदींसह निटूर सोसायटी चे शेतकरी सभासद मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments