Latest News

6/recent/ticker-posts

पोलिस अधीक्षकांच्या सहकार्यामुळे covid-19 मुळे निधन झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या कुटुंबीयांना मिळाली विम्याची रक्कम

पोलिस अधीक्षकांच्या सहकार्यामुळे covid-19 मुळे निधन झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या कुटुंबीयांना मिळाली विम्याची रक्कम


लातूर: पोलीस अंमलदार स्व. नितेश देशमुख हे सन 2006 साली लातूर जिल्हा पोलीस दलात भरती झाले होते. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक म्हणून मुंबई येथे कर्तव्यावर रुजू झाले. मुंबई येथे कर्तव्यावर असताना covid-19 मुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांचे कुटुंबीयांमध्ये पत्नी, एक मुलगी, भाऊ व आई वडील आहेत. कर्तव्यावर असताना त्यांनी एल.आय.सी. च्या दोन पॉलिसी काढली होती. काही महिने त्यामध्ये पैसे सुद्धा भरले होते. 2020 मध्ये आलेल्या covid-19 च्या आजारांमध्ये कर्तव्यावर त्यांचे निधन झाले.

                नितेश देशमुख हे प्रथम लातूर जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत होते. नंतर लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक म्हणून मुंबई येथे रुजू झाले होते. त्यामुळे विम्याच्या दाव्या साठी लागणाऱ्या कागदपत्रची पूर्तता होण्यास बऱ्याच अडचण निर्माण होत होत्या. ही बाब पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे निदर्शनास आल्यावर त्यांनी  विमा दाव्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची प्राधान्याने पूर्तता करण्याचे संबंधितांना आदेशित केले. त्यामुळे विमा दाव्यासाठी लागणाऱ्या प्रशासकीय कागदपत्राची वेळेत पूर्तता झाल्याने एलआयसी विमा कंपनीने सदरचा मृत्यूदावा मंजूर केला. व दिनांक 17/05/2022 रोजी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे उपस्थितीत विमा प्रतिनिधी संजय जगताप, एलआयसीचे शाखा अधिकारी व इतरांच्या उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक स्व.नितेश देशमुख यांचे कुटुंबीयांना सदरचा मृत्यूदावा पत्रक देऊन विम्याची रक्कम वारसदारांच्या बँक अकाऊंट मध्ये जमा करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे सहकार्यामुळे विमा प्रतिनिधी संजय जगताप यांनी पोलीस उपनिरीक्षक स्व. नितेश देशमुख यांचे कुटुंबीयांना विम्याची रक्कम मिळवून दिली आहे.

Post a Comment

0 Comments