Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाचे १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाचे १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश


निलंगा: येथील महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एप्रिल -२०२२ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेचा ९८.६८%, वाणिज्य शाखेचा ९४.६३%, कला शाखेचा ८९.६२% व एम.सी.व्ही.सी. शाखेचा १००% निकाल लागला आहे. विज्ञान शाखेतून नंदिणी विजयकुमार हेडे हीने 85.67% गुण घेऊन प्रथम येण्याचा मान मिळविला. सुमीत विजयकुमार डोंगरे याने 84.67% गुण घेऊन द्वितीय तर अभिजीत आत्माराम काळे याने 83.67% गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवीला आहे. वाणिज्य शाखेतून वैशाली तातेराव धुमाळ हीने 89.50% गुण घेऊन प्रथम येण्याचा मान मिळविला. अंजुम सिकंदर शेख हीने 88.50% गुण घेऊन द्वितीय तर संजिवनी सौदागर जाधव हीने 86.17% गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवीला आहे. कला शाखेतून धनश्री बसवेश्वर कुंभार हीने 86.17% गुण घेऊन प्रथम येण्याचा मान मिळविला. सरस्वती राजु लंगोटे हीने 80.17% गुण घेऊन द्वितीय तर अक्सा हसनमियाँ शेख हीने 77.83% गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवीला आहे. एम.सी.व्ही.सी. शाखेतून पल्लवी उध्दव कांबळे हीने 85.67% गुण घेऊन प्रथम येण्याचा मान मिळविला. ज्योती धनराज बोयणे हीने 78.17% गुण घेऊन द्वितीय तर वेद शाम सिरसले याने 68.83% गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवीला आहे. मार्केटींग शाखेतून पंचशिला मसाजी सुर्यवंशी हीने 63.17% गुण घेऊन उत्तीर्ण झाली. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील, निलंगेकर, संस्था सचिव बब्रुवान सरतापे, संस्था समन्वयक दिलीपराव धुमाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. चंद्रकुमार कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, विज्ञान विभागाचे समन्वयक प्रा. राजेंद्र कटके, व्होकेशनल विभागाचे पर्यवेक्षक प्रा. अनिल नाबदे, प्रा. सुर्यकांत वाघमारे, सीईटी सेलचे समन्वयक प्रा. श्रीराम पौळकर, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.



Post a Comment

0 Comments