देशात संविधान वाचनाची आवश्यकता- इ झेड खोब्रागडे
भीम आर्मी चा संविधान वाचन कार्यक्रम 5 जून 2022 ला शिवाजी पार्क मुंबई येथे असल्याचे समजले. खूप आवश्यक असा उपक्रम हाती घेतला आहे. भीम आर्मीचे अभिनंदन संविधानिक नीतिमूल्ये रुजविण्याचा हा उपक्रम राष्ट्र निर्माणाचा आहे.संविधानाने जसे नागरिकांना हक्क दिले आहेत तसेच नागरिकांचे कर्तव्य सुद्धा आहेत. संविधानातील अजून महत्वाची तरतूद म्हणजे भाग 4 - राज्यांना दिलेले नीती निर्देश.अनुच्छेद 38,39, 41, 45, 46 खूप महत्त्वाची आहेत. अनुच्छेद 46 हे प्रत्येक राज्याचे , देशाच्या विकासाचे vision अँड mission आहे. शैक्षनिक, सामाजिक, आर्थिक विकासाचा, शोषित-वंचित-मागास समाजाला इतर प्रगत समाजाच्या बरोबरीत आणण्याचा मार्ग यात आहे. सन्मानाचे जगणे प्रत्येक नागरिकाला देणे ही खऱ्या अर्थी शासनाची जबाबदारी व कर्तव्य आहे. संविधानाने हे निर्देश राज्यांना दिले आहेत. सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणारी ही तरतूद आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर 1952 मध्ये पुणे येथील सभेत लोकशाहीची व्याख्या करताना सांगतात : लोकांच्या सामाजिक व आर्थिक जीवनात रक्तविहिन मार्गाने क्रांतिकारी बदल घडवून आणणारी शासन पद्धती/राज्यपद्धती म्हणजे लोकशाही देशात, सामाजिक आर्थिक न्यायाची लोकशाही देणारी शासन पद्धती अजूनही कार्यान्वित झाली नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते.
भारताला , 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळाले, इंग्रज गेले, त्यांची जुलमी, गुलामीची सत्ता गेली.संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान अर्पण झाले. 26 जानेवारी 1950 ला देश लोकसत्ताक झाला, परंतु संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितली अशी लोकशाही अजून ही आली नाही.संविधानिक नीतिमूल्ये नागरिकांमध्ये व विशेषतः कायदेमंडळ आणि कार्यकारी यंत्रणेमधील व्यक्तींमध्ये रुजविण्याचे प्रयत्न 1950 पासून सुरू झाले नाहीत. त्यामुळे आजही,ब्रिटिश धार्जिनी, जातीपाती व धर्मसत्तेचे वर्चस्व सांगणारी राज्य सत्ता वेगवेगळ्या रुपात कार्यरत आहे.या पार्श्वभूमीवर,संविधान वाचन हा उपक्रम मोलाचा व महत्वाचा ठरतो आहे.संविधानाचा जागर करणे आणि लोकांना जागृत करणे फार आवश्यक आहे.
माझ्या माहितीप्रमाणे ,पहिल्यांदाच , संविधान फौंडेशन च्या वतीने
:स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव.....
:महाराष्ट्र दिवस - 62 वा.........
:जागतिक कामगार दिवस.......
निमित्त:- नागपूर येथे संविधान चौकात 01 मे ला 2022 ला संविधान वाचन कार्यक्रम संपन्न झाला.
:राष्ट्राची एकता आणि एकात्मतेसाठी बंधुभाव प्रवर्धित करण्याचा चा संदेश देणारा हा कार्यक्रम होता. एक छोटीशी सुरुवात होती. या माध्यमातून जनतेला अपील होते,संविधान जागरासाठी. देश हिताचे हे कामआहे.
सद्या देशात, जाती धर्मावरून माणसा माणसात द्वेष निर्माण करण्याच्या प्रयत्न होत आहे. हनुमान चालीसा पठण,भोंगे उतरवणे असे नॉन issue ला issue बनवून सामाजिक सौदार्याचे वशांततेचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होत आहे. आपण,समानता,स्वातंत्र्य, बंधुता व न्याय च्या तत्वानुसार माणसे जोडण्याचे काम करू, प्रेम, मैत्री, करुणा, बंधुभाव, या शाश्वत मूल्यांचा जागर करू. हा सर्वांचा सर्वांसाठी असा कार्यक्रम आहे. तेव्हा ,संविधान वाचन हा कार्यक्रम जनतेनी त्याचे गावात, शहरात, वार्ड- मोहल्यात, जिल्ह्यात आयोजित करावा. संविधानाचा सन्मान व संविधानानुसार वर्तन भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे. विकासाचा अजेंडा राबविणे आवश्यक2आहे. त्यातून ,सर्वांगीण प्रगती साधता येते.
इ.झेड.खोब्रागडे{ भाप्रसे, नि} संविधान फौंडेशन, नागपूर
0 Comments