भादेकर त्रिमूर्तीची नवोदयसाठी निवड,औसा तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव; शाळा,गावाचे नाव बुध्दीमत्तेच्या यादीत एन्ट्री
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा येथील भूमिपुत्र असणारे परंतु सध्या जि प प्रशाला वडजी ता. औसा या शाळेमध्ये शिक्षण घेणारे हर्ष उत्तम गवळी,अंश दयानंद गवळी हे विद्यार्थी सख्खे चुलत भाऊ असून या दोघांचे वडील शासकीय कर्मचारी आहेत तर भादा जि प प्रशालेतील रमन केशव गायकवाड याचे वडील एस्टी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असून या तिन्ही मुलाचे शिक्षण यशस्वी व्हावे यासाठी हे तिन्ही पालक हे एकमेकांचे सच्चे मित्र असून या तिन्ही भादेकरानी निलंगा येथे एका नवोदय खाजगी क्लासेस लावल्याचे समजते तर निलंगा आणि संबंधीत गावातील नवोदय क्लासेस केल्याचा फायदा आणि शाळेतील मार्गदर्शनामुळे या तीनिही मुलाची बुद्धिमत्ता यांचा संयोग होऊन यांना चांगले यश प्राप्त झाले असून या तीनही भादेकर पुत्राचे यशस्वी मुले एकाच गावातील नवोदय साठी एकाच वेळी निवड झाल्याने भादा गावासाठी आनंद क्षण आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे,पालकांचे औसा तालुक्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
0 Comments