Latest News

6/recent/ticker-posts

लातूर शहरातील ट्युशन एरियातील तो व्हिडिओ पूर्वीचाच,अफवा पसरवू नये,पोलिसाचे आवाहन

लातूर शहरातील ट्युशन एरियातील तो व्हिडिओ पूर्वीचाच,अफवा पसरवू नये,पोलिसाचे आवाहन

लातूर: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मारहाणीच्या व्हिडिओ क्लिपच्या अनुषंगाने एक महिना अगोदरच पोलिसात गुन्हा नोंद..याबाबत माहिती अशी की, दोन ते तीन दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मुलास इतर मुले मिळून मारहाण करीत असलेली व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यामध्ये सदरची क्लिप ही ट्युशन एरिया मधील असल्याच्या सांगण्यात येत आहे.

             सोशल मीडियावर वायरल होत असलेली व्हिडिओ क्लिप ही एक महिना पूर्वीची असून सदर व्हिडिओ क्लिप मध्ये काही मुले मिळून एका मुलास मारहाण करीत असल्याचे दिसत आहे. सदर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ क्लिप मधील पीडित मुलाने दिलेल्या फिर्याद वरून दिनांक 13/06/2022 रोजी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 261/ 2022 कलम 141, 143,145, 148, 149, 392 307, 341, 363, 364, 120 (ब) भादवी0 मधील "काहीतरी उपद्रव अथवा गुन्हा करण्याच्या उद्देशाने जमाव जमीविणे, जबरी चोरी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करणे, कट रचने अशा गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे शिवाजीनगर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत कुदळे यांनी केला असून वरिष्ठांचे मार्गदर्शनात विविध पथके तयार करून सदर पथकामार्फत सदर गुन्ह्यामध्ये व्हायरल व्हिडिओ क्लिप मधील पीडित मुलास मारहाण करणारे खालील आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. ● गौस उर्फ मुन्ना इस्माईल शेख, वय 18 वर्ष,राहणार जुना औसा रोड  आर.जे. कॉम्प्लेक्स जवळ, लातूर. ● वैजनाथ दयानंद मुळे, वय 24 वर्ष, राहणार एलआयसी कॉलनी, बलदवा नगर  स्वप्नपूर्ती कॉम्प्लेक्स च्या पाठीमागे, लातूर. ● साहिल दस्तगीर शेख, वय 20 वर्ष, राहणार बलसुर तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद. सध्या राहणार प्रगती नगर, एलआयसी कॉलनी, लातूर. ● सोहेल शादुल पठाण, वय 20 वर्ष, राहणार एलआयसी कॉलनी, प्रगती नगर ,लातूर. ● दिनेश अर्जुन शेंडगे, राहणार एलआयसी कॉलनी, लातूर. ● परमेश्वर बाबुराव जाधव, राहणार खंडाळी तालुका लातूर. ● आदिनाथ रमेश राठोड, राहणार रामापुर तालुका पालम जिल्हा परभणी. या गुन्ह्यांमध्ये वर नमूद सात आरोपींना अटक करण्यात आलेली आली होती. त्यांना अटक करून मा. न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपी क्रमांक 1 मुन्ना शेख याचे विरोधात दिनांक 04/07/2022 रोजी 25/2022 कलम 110 (ई)(ग) अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे.

      लातूर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की,सोशल मीडियावर एखादी माहिती प्रसारित करीत असताना त्याची शहनिशा करावी. आपल्याकडून खोट्या बातम्या, चुकीची माहिती, पसरविली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

                 चुकीची माहिती प्रसारित झाल्याने समाजात चुकीचा संदेश जाऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्‍यता असते. तरी या दृष्टीने सावधानता बाळगावी. काही उपयुक्त माहिती असल्यास पोलिसांकडे संपर्क करावा.

Post a Comment

0 Comments