जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची केळगाव-लांबोटा वन उद्यानाला भेट
लातूर: जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी काल शनिवारी सायंकाळी सपत्नी निलंगा तालुक्यातील केळगाव-लांबोटा वनउद्यानाला, वन विभागाला भेट दिली व फेरफटका मारला वन क्षेत्रात असलेल्या रामलिंगेश्वराचे ते दर्शन घेतले त्यानंतर वन विभागाच्या वन उद्यानामध्ये पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व त्यांच्या पत्नी सौ. पिंगळे मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपणाचे कार्यक्रम करण्यात आले यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शिल्पा गीते, "मराठी अस्मितेचा इशारा" च्या वृत्तपत्राचे संपादक के.वाय.पटवेकर, पत्रकार जावेद मुजावर, चंद्रकांत रोड़े, आदिनाथ रोड़े, समद(चाचा) शेख, गहिनीनाथ रोड़े, शिवाजी सूर्यवंशी, भिकाजी कांबळे व वन विभागाची पूर्ण टीम यावेळी वृक्षारोपण करताना उपस्थित होती. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी निसर्गरम्य वातावरणाची पाहणी करून समाधान वाटल्याचे बोलले.
0 Comments