Latest News

6/recent/ticker-posts

उमरगा येथील ज्येष्ठ व्यापारी अमीरपाशा उस्मानसाब मणियार यांचे दुःखद निधन

उमरगा येथील ज्येष्ठ व्यापारी अमीरपाशा उस्मानसाब मणियार यांचे दुःखद निधन


उमरगा: येथील ज्येष्ठ व्यापारी अमीरपाशा उस्मानसाब मणियार यांचे दुःखद निधन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलाही राजिउन. दि. 21 जुलै 2022 रोजी गुरुवार रात्री अंदाजे 8:30 वाजेच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने सोलापूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले मृत्यूसमयी ते 70 वर्षाचे होते. मूळचे पानगाव येथील गेल्या अनेक वर्षापासून उमरगा( चौ-रस्ता ) येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ व्यापारी अमीरपाशा मणियार हे पंचक्रोशीत सर्वपरिचित होते. इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ मार्गदर्शक होते त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिव देहावर आज दि. 22 जुलै वार शुक्रवार रोजी( नमाज अदा झाल्यानंतर ) दुपारी 2:30 वाजता उमरगा येथील कब्रिस्तान मध्ये दफन विधी (अंतीमसंस्कार) करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व दोन मुली, जावई नातू-पणतू असा मोठा परिवार आहे. रसूल मणियार, मुस्तफा मणियार, हबीब मणियार यांचे वडील बंधू होत "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment

0 Comments