औसा तालुक्याला पावसाचा दणका,पेरणीसह अंतर्गत मशागतीला ब्रेक
बी डी उबाळे
औसा: गेल्या चार ते पाच दिवसापासून औसा तालुक्यात पावसाने ब्रेक दिला होता परंतु शुक्रवार दिनांक 22 जुलै 20 22 रोजी सकाळीच पावसाने तालुक्यात विविध भागांमध्ये चांगला ते मध्यम स्वरूपात पाऊस पडत असल्याने शेतीसाठी उपयुक्त सुरू असलेली पेरणी आणि पिकातील अंतर्गत मशागत सह फवारणी या पावसामुळे ब्रेक लागला आहे तर आता नुकतेच गोगलगायींचा प्रादुर्भाव पीक वाढीमुळे कमी होत असतानाच आणखी पावसाने जोरदार दणका दिल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक मनका मोल्याचे चित्र सध्या औसा तालुक्यामध्ये दिसून येत आहे.
यामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असतानाच पिके काही प्रमाणात सुधारणा होत होती तर मध्येच पावसाने जोरदार एन्ट्री मारल्याने औसा तालुक्यातील पीक परिस्थिती मोठी गंभीर असल्याचे चित्र निर्माण झाल्या असून यावर्षीचा पाऊस हा शेतीसाठी अनावश्यक ठरत असल्याचे चित्र औसा तालुक्यात दिसून येत आहे. तर हा पाऊस अवेळी पडत असल्याने पिकासाठी पूरक न ठरता पिकासाठी धोकादाएकच ठरत आहे.
0 Comments