Latest News

6/recent/ticker-posts

भादा येथे महावृक्ष लागवड अभियान मोहीम सुरू

भादा येथे महावृक्ष लागवड अभियान मोहीम सुरू


बी जी शेख

औसा: तालुक्यातील भादा येथे महामृक्ष लागवड अभियान राबविण्यात येत असून या अंतर्गत भादा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 2 हजार वृक्ष लागवड करण्यात येत आहेत. यापूर्वीच 2 हजार नारळाची वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे.


यानिमित्त आंबा, नारळ ,चिंच ,आपटा ,शिरस,अशोक,आदेि वृक्ष या मियावाकी, वृक्ष लागवडीकरिता लावण्यात येत असून भादा येथील ग्राम विकास अधिकारी माणिक सूर्यवंशी आणि कामानिमित्त भादा येथे आलेले माजी ग्रामविकास अधिकारी उमेश बनसोडे हे उपस्थित होते.


यावेळी भादा सरपंच मिनाबाई दरेकर यांच्याही हस्ते या ठिकाणी वृक्ष लागवड करून वृक्ष लागवड सुरुवात करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी लखन लटुरे, नंदू फरताळे, शिवाजी बनसोडे, भैरव मोरे, ब्रह्मानंद स्वामी, "मराठी अस्मितेचा इशारा" वृत्तपत्राचे उपसंपादक बी डी उबाळे, मि.सरपंच हणमंत दरेकर सह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments