भादा येथे तुरीच्या बियाणांचे शेतक-यांना वाटप
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा येथे शेतकऱ्यांनी ऑनलाइन बियाणे मागणीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून तुरीचे बियाणे उपलब्ध झाले असून ते भादा तालुका औसा येथे मिनी किट तूर(राजेश्री बियाणे) गुरुवार दिनांक 7 जुलै 2022 रोजी ग्रामपंचायत कार्यालय भादा येथे आधार कार्ड घेऊन वाटप करण्यात आले.
यावेळी वितरित करताना कृषी सहाय्यक सुरेखा गव्हाणे, दत्ता चिंचोलकर, अकबर मोगल आणि ज्यांना हि बियाणांची सोडत पद्धतीने लॉटरी लागली ते शेतकरी उपस्थित होते.
0 Comments