Latest News

6/recent/ticker-posts

कोल्हापूर इचलकरंजी येथे राजस्तरीय कलारत्न पुरस्कार 2023 गीतकार व लेखिका ललिता वानखडे यांना प्रदान

कोल्हापूर इचलकरंजी येथे राजस्तरीय कलारत्न पुरस्कार 2023 गीतकार व लेखिका ललिता वानखडे यांना प्रदान

कोल्हापूर: श्रावस्ती बहुउद्देशीय संस्थेचे अंतर्गत गौरव महाराष्ट्राचा सन्मान मराठी माणसाचा येथे  कलाकारांनी कलाक्षेत्रात निस्वार्थी कार्य केल्यामुळे समाज परिवर्तनाचं कार्य होत आहे. अशाच कलाकारांची त्यांनी केलेल्या कामाबद्दल असलेली निष्ठा आणि तळमळ याची दाखल घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांची प्रेरणा इतरांना ही मिळावी या अनुषंगाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दिनांक 5/2/2023 ला वेळ 1:00 वाजता पासून ना. बा. घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी कोल्हापूर येथे हा 


राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा थाटात संपन्न झाला असुन अमरावती शहरातील कला व लेखण क्षेत्रात कार्यरत असलेल्या ललिता वानखडे यांची कलाक्षेत्रातील कार्याची महती लक्षात घेऊन त्यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार २०२३ 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना खासदार हातकणंगले लोकसभा मतदार संघ स्वागताध्यक्ष आमदार डॉ. सुजित निमचेकर हातकणंगले विधानसभा मतदार संघ प्रमुख उपस्थिती आश्विनी सतिश ढेंगे संस्थापक अध्यक्षा आई दुर्गा फाऊंडेशन, कोल्हापूर  या सर्व मान्यवरांच्या हस्ते ललिता वानखडे यांना "राजस्तरीय गुणवंत कलाकार पुरस्कार" 2023 व सन्मानचिन्ह देऊन पुरस्कृत केले.  त्यामुळे गीतकार  ललिता वानखडे यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments