Latest News

6/recent/ticker-posts

औसा तालुक्यात अमृत महाआवास अभियान प्रत्येक ग्राम पंचायत मध्ये साजरे होणार

औसा तालुक्यात अमृत महाआवास अभियान प्रत्येक ग्राम पंचायत मध्ये साजरे होणार


बी डी उबाळे 

औसा: औसा तालुक्यात महआवास अभियान आता प्रत्येक ग्राम पंचायत मध्ये साजरे होणार. मुख्य कार्यकारी अधिकारी,लातूर यांच्या आदेशाने अमृत महाआवास अभियान २०२२-२३ अंतर्गत सर्व ग्रामपंचायत मध्ये आज दि. १० फेब्रुवारी २०२३ रोजी घरकूल लाभार्थी मेळावा आयोजीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.


त्यानुसार औसा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये  सकाळी ०९.०० ते ११.०० या वेळेत मेळावा आयोजीत करुन प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, अटल बांधकाम आवास योजना अशा सर्व घरकूलाच्या लाभ घेतलेल्या लाभाथ्र्यांचा खालील विषयाच्या अनुषंगाने मेळावा सरपंच, ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत आयोजीत करण्यात आला आहे. तसेच या मेळावा यशस्वीरित्या पारपाडण्यासाठी पंचायत समिती स्तरावर एक नोडल अधिकारी नेमणूक करण्यात आले आहे.

या अमृत महाआवांस अभियानात विहीत मुदतीत घरकुल पूर्ण केलेल्या लाभाधारकांचा सत्कार करणे,विहीत घरकुल पूर्ण केलेल्या लाभधारकांचे मनोगत घेणे,अपूर्ण असलेल्या घरकुल लाभधारकांना प्रोत्साहन देऊन घरकुल पूर्ण करणे,घरकुल पूर्ण करण्यासाठी गावातील सर्व घटक, सरपंच, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, बचतगट महिला कर्मचारी यांचा जास्तीत जास्त सहभाग करून घेण्यात यावा,जागा नसलेल्या घरकूल लाभधारकांना जागा उपलब्ध करुन देणे बाबत नियोजन करणे,पंडित दिनदयाल उपाध्याय अंतर्गत लाभार्थीना जागा खरेदीसाठी अर्थसहाय्यक देणेसाठी मार्गदर्शन करणे,घरकुल मार्ट सुरवात करुन लाभाथ्र्यांना घरकुल मार्ट मदून साहित्य खरेदी करण्यास परावृत करणे,ग्रामपंचयत कर वसुली करणे बाबत प्रोत्साहन देणे. अनुषंगीक इतर विषय आहेत. तरी सदर मेळाव्यास जास्तीत जास्त घरकूल लाभधारक / बचतगटांच्या महिला उपस्थित राहतील असे आहवान गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे,पंचायत समिती औसाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments