जेष्ठ साहित्यिक विजय चव्हाण लिखीत समाजचिंतक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
लातुर: येथील साहित्यिक विजय शंकरराव चव्हाण लिखित समाजचिंतक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज दि.16 फेब्रूवारी रोजी भालचंद्र ब्लड बँक,लातूर येथे पंजाबचे माजी राज्यपाल तथा कांग्रेसचे जेष्ठ नेते शिवराज पाटील चाकुरकर यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हभप गहिनीनाथ महाराज हे होते.व्यासपीठावर माजी खासदार डाॅ. जनार्दन वाघमारे, शिक्षक आमदार विक्रम काळे, प्रा.नागोराव कुंभार डॉ. शेषराव मोहिते, भाई धनंजय उद्धवराव पाटील,प्रा.डॉ.रणजीत जाधव हे होते.
समाजचिंतक हे पुस्तक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याच्या सामाजिक जीवनावर प्रकाश टाकणारे आहे. समाजाबद्दल असणारी आंतरीक ओढ यावर शरद पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतोय असे लेखकाने प्रस्तावनेमध्ये सांगितले. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी भाषणातुन पुस्तकाचे लेखक विजय शंकरराव चव्हाण यांचं कौतुक केलं.
0 Comments