वातावरणातील बदलामुळे रूग्नसंख्येत वाढ; काळजी घेण्याचे आवाहन
बी डी उबाळे
औसा: तालुक्यामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसापासून वातावरणातील अचानक बदलामुळे रुग्ण संकेत मोठी वाढ झाल्याचे भादा तालुका औसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ महेश पवार यांनी सांगितले. सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून या बदलाचा दुष्परिणाम हा मानवी जीवनावर होत असून ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांची संख्या सरासरीपेक्षा वाढ झाल्याचे दिसून येत आहे.तर या रुग्णांमध्ये सर्दी ,खोकला, ताप हे व्हायरल इन्फेक्शन आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.हे प्रमाण जास्त वयोवृद्ध व्यक्ती आणि लहान मुले यांच्यामध्ये जास्त असल्याचे दिसून येत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ महेश पवार यांनी सांगितले की, सकाळी थोडे उशिरा उठणे आणि आपल्या शरीराच्या संरक्षणा होण्यासाठी गरम कपड्यांचा वापर करणे आणि बाहेर वातावरणातील परिणामासाठी घराबाहेर कमी प्रमाणात निघणे तसेच थंड पाणी पिण्याऐवजी सतत कोमट पाण्याचाही वापर केला तरी चालेल आणि अंतर्गत शारीरिक स्वच्छता राहण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी मुख स्वच्छता करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल ज्यामुळे व्हायरल इन्फेक्शन होणार नाही.
आपण दिवसभर कामानिमित्त इतरत्र, गावी,बाहेरगावी फिरतो ज्यामुळे आपण वातावरणातील प्रदूषणामध्ये गेले असता जंतू संसर्ग होणार नाही याकरिता सकाळी आणि रात्री घरी आल्यानंतर शारीरिक स्वच्छता याकडेही मोठ्या प्रमाणात लक्ष देणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपले शरीर आरोग्यदायी आणि निरोगी राहील याची दक्षता प्रत्येक नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. असा सल्ला नागरिकांना आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकारी डॉ महेश पवार यांनी भादा आणि परिसरातील नागरिकाना सल्ला दिला आहे.
0 Comments